Nigdi : महिला पोलिसांचा मॉडर्न कॉलेजच्या वतीने सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त (Nigdi) आज (8 मार्च) मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने निगडी येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प, भेट वस्तू व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी महिला पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम उपस्थित होत्या. त्यांनी महिला पोलीस सहाय्यकांचे कौतुक केले व त्यांच्या कार्याला दाद दिली.

तसेच त्या म्हणाल्या, “कोणत्याही प्रकारच्या आरोपीला बेधडक भिडण्याची शक्ती महिला पोलिसांमध्ये आहे. हे कार्य करताना कोणतीही सवलत न मागता घरची जबाबदारी आणि पोलिसांचे कर्तव्य या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडून समर्थपणे पार पाडल्या जातात.”

गोंदिया येथील त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी तीन गावात दारूबंदी केल्याचा अनुभव कथन केला. मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयिका सुजाता बलकवडे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. कोरोना काळात व इतर अनेक प्रसंगांमध्ये महिला पोलीसही तितकेच तत्पर राहून कार्य करतात याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Talegaon Dabhade : स्टेशन परिसरातील म्हाडा प्रकल्पास पाणी पुरवठ्यास राष्ट्रवादीचा विरोध

त्या म्हणाल्या, की “महिलांनी केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी (Nigdi) प्रोत्साहन मिळावे, म्हणून महिलांनीच महिलांचा आदर करायला हवा.” या कार्यक्रमासाठी मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. जोत्स्ना एकबोटे, प्रमुख्याध्यापक योगेश ठिपसे, प्राचार्य प्रकाश पाबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, तसेच समन्वयक नरेंद्र चौधरी व सुजाता बलकवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना धुमाळ यांनी केले व आभार अनघा जोशी यांनी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.