Indapur : पोलीस भरतीच्या तयारीत असलेल्या 22 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

एमपीसी न्यूज : पोलीस भरतीच्या तयारीत असलेल्या 22 वर्षीय शेतकऱ्याचा (Indapur) शेतात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 7 मार्च) काटी, ता. इंदापूर येथे वादळी पावसात घडली. या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ पसरली आहे.  

ओंकार दादाराम मोहिते असे मृत तरुणाचे नाव आहे. ओंकार हा त्याच्या शेतात गेला असता, सायंकाळी वादळी पाऊस झाला. शेतात असताना त्याला विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Talegaon Dabhade : स्टेशन परिसरातील म्हाडा प्रकल्पास पाणी पुरवठ्यास राष्ट्रवादीचा विरोध

काटी येथील मोहिते वस्ती येथे राहणारे दादाराम महादेव मोहिते यांना एक मुलगा ओंकार व दोन मुली (Indapur) आहेत. पोलीस भरतीची तयारी करताना ओंकार वडिलांना शेतीत मदत करायचा. शांत, मनमिळाऊ, संयमी आणि कर्तव्यदक्ष तरुण म्हणून परिसरात त्यांची ओळख होती. याबाबत तुकाराम भिवा मोहिते यांनी इंदापूर पोलिसांना माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.