Talegaon Dabhade : स्टेशन परिसरातील म्हाडा प्रकल्पास पाणी पुरवठ्यास राष्ट्रवादीचा विरोध

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन परिसरात सुरू असलेल्या म्हाडाच्या प्रकल्पाला (Talegaon Dabhade) इंद्रायणी विद्यामंदीर कॉलनी मधील पाईपलाईनला जोडणी देऊन पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या पाईपलाईनवर मोठ्ठा परिसर अवलंबून असल्याने म्हाडा प्रकल्पास देखील याच लाईन वरून पाणीपुरवठा केल्यास पाण्याची कमतरता भासेल. त्यामुळे म्हाडाने स्वखर्चाने सिद्धार्थ नगर येथील पाणी टाकीपासून नवीन योग्य त्या व्यासाची लाईन टाकून घ्यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष गणेश काकडे यांनी केली आहे. काकडे यांनी हरकतीबाबतचे पत्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिले आहे.

यावेळी माजी नगरसेवक अरूण माने, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शैलजा काळोखे, तळेगाव शहर युवक माजी अध्यक्ष आशिष खांडगे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र दाभाडे, हर्षद पवार, गणेश नीळकंठ, ओंकार जाधव, पुष्कर दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

काकडे यांनी हरकती पत्रात म्हटले की, तळेगाव स्टेशन परिसरात सर्वे नंबर 12 येथे म्हाडाचा हाउसिंग प्रोजेक्ट चालू आहे. त्या प्रोजेक्टमध्ये सुमारे 560 सदनिका बांधण्यात येत आहेत. हा प्रोजेक्ट आता चालू असून त्यास अजून कुठल्याही प्रकारचे पूर्णत्वाचा दाखला त्यांना प्राप्त झालेला नाही. त्यांचे तर्फे नगरपालिकेस पाणी मिळण्यासाठी मागणी होत आहे.

तळेगाव शहरामध्ये 2011 च्या जणगणनेनुसार तळेगाव शहराची लोकसंख्या अंदाजे 57000 दर्शवली आहे. पण, प्रत्यक्षात तळेगाव शहराची लोकसंख्या ही 1 लाखाच्या पुढे आहे. सध्या तळेगाव शहरामध्ये गाव विभागमध्ये पवना नदीवरून पाणी पुरवठा होतो. अंदाजे 13-14 एम एल डी रोज होतो. गाव विभागात फिडर एक्स्प्रेस आहे. अद्यावत असा फिल्ट्रेशन प्लांट असल्याचे म्हटले आहे.

Ncp : प्रामाणिकपणे शास्ती भरणार्‍यांची रक्कम पुढील बिलात समायोजित करा – अजित गव्हाणे

तर स्टेशन विभागाकडे पाहत असताना गाव विभागाच्या तुलनेमध्ये लोकसंख्या जास्त आहे. स्टेशन विभागाला इंद्रायणी नदी वरून रोज 8-9 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. स्टेशन भागामध्ये फिडर एक्सप्रेस नाही, त्यामुळे पूर्ण दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तळेगाव स्टेशन भागात यशवंतनगर भागात फक्त 6 लाख लिटर तर सिद्धार्थनगर येथे 8 लाख लिटर पाणी टाकी आहे.

तळेगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 4 हे जास्त लोकसंख्या असलेले प्रभाग आहेत व याच दोन पाणी टाकीमधून पाणी पुरवठा होतो व तसेच या चार प्रभागास पाणीपुरवठा करण्यासाठी 16 ते 18 तास लागतात. नव्याने झोन निर्मिती करून अधिकचा (Talegaon Dabhade) पाणी पुरवठा करणे शक्य नाही. इंद्रायणी नदीवरून 24 तास पाणी पम्पिंग करण्याचा प्रयत्न असतो तरी देखील पाणी पुरवठा हा असुरळीत आहे.

म्हाडा गृह प्रकल्पचा जो आग्रह आहे. इंद्रायणी विद्या मंदीर कॉलनीच्या 10 इंची लाईन वरती आम्हाला आमच्या जोडणी करून द्यावी, पण वास्तविक इंद्रायणी विद्या मंदिरचे लाईनवर आनंद नगर, वनश्री नगर, शिवनेरी सोसायटी, इंद्रायणी कॉलनी, स्वप्न नगरी, अंबिका पार्क, सिमको कॉलनी, मोहन नगर, जोशी वाडी, स्वामी समर्थनगर या सर्वांचा पाणीपुरवठा हा केला जात असल्याचे म्हटले आहे.

म्हाडा गृह प्रकल्पास पाणी पुरवठा हवा असेल, तर त्यांनी स्वखर्चाने सिद्धार्थ नगर येथील पाणी टाकी पासून नवीन योग्य त्या व्यासाची लाईन टाकून घ्यावी. लोकसंख्येचा व तांत्रिक गोष्टींचा विचार करता तळेगाव स्टेशनचा पाणी पुरवठा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

अनेक निवडणूका या वरती लढवल्या गेलेल्या आहेत. आपण जर या पाणी पुरवठा संदर्भात चुकीचा निर्णय घेऊन लाईन जोडण्याचा आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. तर, तळेगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष व विविध संघटना व रहिवासी यांना एकत्र करून तीव्र स्वरूपाचा लढा उभारला जाईल आणि यास सर्वस्वी आपण जबाबदार असणार असल्याचेही काकडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.