Halal show : हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित  

एमपीसी न्यूज – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे हलाल प्रमाणित’ वस्तूंचे ‘ प्रमोशनकरण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला हलाल शो इंडियाआयोजकांनी रहित केल्याचे जाहीर केले.

देशातील ‘हलाल प्रमाणिकरण’ पद्धत बंद होईपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, अशी प्रतिक्रिया ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’चे समन्वयक सुनील घनवट यांनी व्यक्त केली. समितीच्या या यशाबद्दल घनवट यांनी सहभागी सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले, तसेच ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त केली.(Halal show) मरीन ड्राईव्ह येथील ‘इस्लामिक जिमखाना’ येथे 12 आणि 13 नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम मिडिया’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हलाल प्रमाणपत्र द्वारे मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे लक्षात आल्यावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला.

Lions Club : लायन्स क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष दिपक शहा यांचा ‘अ‍ॅम्बेसडर ऑफ गुडविल अ‍ॅवॉर्ड’ने सन्मान

‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच बैठका घेण्यात आल्या. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याची चेतावणी समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिली होती.(Halal show) ‘हलाल शो इंडिया’ रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन हलाल प्रमाणपत्र यातून मिळणारा पैशाचा वापर कुठे केला जातो, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.