NCP Protest : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आळंदीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने जोडे मारो निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज : आळंदीमधील महाद्वार चौकात (NCP Protest) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

त्यामुळे मंगळवारी सायंकाळी 5 वाजता महाद्वार चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार मुर्दाबाद, अब्दुल सत्तारच करायचं काय खाली डोकं वर पाय? अशा घोषणा येथे देण्यात आल्या. या आंदोलनात सहभागी असणारे सर्व कार्यकर्ते म्हणाले, त्यांचा माफीनामा नकोय राजीनामा हवाय. व त्यांच्या फ्लेक्स स्वरूपात आणलेल्या फोटोला कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला. नंतर ते फ्लेक्स जाळण्यात आले.

Halal show : हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित  

आळंदी पोलीस स्टेशनमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँ.चे पदाधिकारी प्रकाश कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, आरिफ शेख, रोहन कुऱ्हाडे, भाऊसाहेब कोळेकर, पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे, मृदुल भोसले, संदेश तापकीर, मंगलाताई वेळकर, शुभम जाधव, ओम गंगोत्री, निसार सय्यद, सुशीला मंजूळे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.