Pune : रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि चार जिवंत काडतुसासह एका तरुणाला अटक केली.

मयुरेश ज्ञानेश्वर बिबवे (वय-27, रा. बिबवेवाडी गावठाण, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून रिव्हॉल्वर आणि चार जिवंत काडतुसे असा 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक वाहनचोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधार्थ चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरत असताना पांडव नगर पाषाण येथे पिस्तूल घेऊन एक तरुण थांबल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरून त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि चार जिवंत काडतुसे आढळली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन भोसले-पाटील, सपोनी धनंजय कापरे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील पोलीस कर्मचारी सचिन जाधव, इरफान मोमीन, सुधाकर माने, रिजवान जिनेडी, प्रकाश लोखंडे, मेहबूब मोकाशी, अशोक माने, तुषार खडके, सुभाष पिंगळे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.