Vadgaon Maval : नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाकडे

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांची सोडत जाहीर

एमपीसी न्यूज – नव्याने स्थापन झालेल्या मावळ तालुक्यातील वडगाव मावळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांची सोडत आज (बुधवारी) नगरविकास मंत्री रणजीत पाटील व मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थित मुबई येथे काढण्यात आली. त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवारांनी आनंद व्यक्त केला.

मावळ तालुक्यातील वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायतीचे फेब्रुवारी 2018 मध्ये नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. त्यानंतर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीनंतर नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार हे बुधवारी स्पष्ट झाले. हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. कुठलेही आरक्षण न पडल्यामुळे कोणत्याही प्रवर्गातील व्यक्तींना नगराध्यक्षपदी संधी मिळणार आहे.

यापूर्वी वडगाव मधील 17 प्रभागाचे आरक्षण सोडत काढुन ती जाहीर करण्यात आली होती. या आरक्षण सोडतीत अनेक तीव्र इच्छुकाचे पत्ते कट झाले होते परंतु आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी जाहीर झाल्याने या नाराज उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस वडगाव मध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . सद्यस्थिती वडगाव मध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसामान्य जागेसाठी जाहीर झाल्याने वडगाव मध्ये हि निवडणूक प्रचंड रंगणार हे निश्चित .

प्रभाग आरक्षण व रचना पुढील प्रमाणे

प्रभाग 1- अनुसिचीत जमाती सर्वसाधारण ( सांगवी गावची हद्द ते खापरे ओढा पुल , केशवनगर मधील भैरवनाथ नगर, ढोरे वस्ती , पवार वस्ती , अमृत काकडे व सावरकर वसतीगृह

प्रभाग 2 सर्वसाधारण ( पुर्ण कातवी गाव व केशवनगर मधील अष्टविनायक सोसायटी व शेती क्षेत्र भाग)
प्रभाग 3- ओ बी सी महीला ( केशवनगर दक्षिण भाग, ढोरे वाडा काही भाग व मधुबन वसाहत)

प्रभाग 4- ओबीसी सर्वसाधारण ( तुमकर, वायकर घर, ढोरेवाडामधील काही घरांचा समावेश , कुंभारवाडा, ढोरेवाडा , संजय वहीले ते निलेश म्हाळसकर)

प्रभाग 5- ओबीसी महिला ( ढोरेवाडा, कुंभारवाडा व सदाशिव म्हाळसकर कॉम्पलेक्स् )
प्रभाग 6 – सर्वसाधारण महिला ( ढोरे वाडा , खंडोबा चौक व पंचमुखी मारुती मंदिर)
प्रभाग 7- अनुसुचित जातीसर्वसाधारण( कुडेवाडा काही भाग मिलींद नगर, लक्ष्मीनगर जाधववस्ती )
प्रभाग 8- ओबीसी महीला ( पाटीलवाडा , म्हाळसकर गुरव वाडाकुडेवाड काही भाग)
प्रभाग 9- सर्वसाधारण ( इंद्रायणी नगर, बवरे वाडा , चव्हाण वाडा)
प्रभाग 10 – सर्वसाधारण महीला ( विजय नगर, तहसिलदारआँफीस, दत्तमंदीरबाजारपेठ)
प्रभाग 11- ओबीसी सर्वसाधारण ( पोटोबा मंदीर, महादेव , क्शिक्षक सोसायटी, वडगाव कोर्ट, तळे, शांतीदिप सोसायटी माळीनगर)
प्रभाग 12- सर्वसाधारण( माळीनगर अर्धा भाग, ढोरे वाडा, ठाकर वस्ती)
प्रभाग 13- सर्वसाधारण महिला( म्हाळसकरवाडा, भिलारे वस्ती ढोरे वस्ती, संस्कृती सोसायटी )
प्रभाग 14- अनुसुचित जाती महीला(। संस्कृती कॉलणी, ठोबंरे वस्ती, ढोरे वस्ती, संस्कृती कॉलणी )
प्रभाग 15- सर्वसाधारण( टेल्को कॉलणी, चव्हाणनगर, डेक्कनहिल, कुडे वाडा)
प्रभाग 16- सर्वसाधारण महीला ( म्हाळसकर वस्ती सहारा हॉटेल, राम म्हाळस्कर यांचे घर, ते टाटा हौसींग सोसायटी)
प्रभाग 17- सर्वसाधारण महीला ( लिटाका, हरणेश्वर टेकडी, चितांमणी नगर व महाळसकर वस्ती)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.