PCMC News : सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय अधिका-यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला असून त्याअनुषंगाने नोव्हेंबर 2022 या महिन्यात क्षेत्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे. (PCMC News) महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज (मंगळवारी) सबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांनी प्रथम, ड क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी द्वितीय तर ब क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले, अशी माहिती स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांनी दिली.  

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, महापालिकेचे सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराला देशात सर्वप्रथम आणण्यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने त्यांनी केलेल्या कामकाजाचे काही निकषांच्या आधारावर गुणांकन देण्यात आले आहे.

PCMC News : 25 नागरिकांचे जीव वाचविणाऱ्या अग्निशमन अधिकारी, कर्मचा-यांचा ‘शौर्य प्रमाणपत्र’ देऊन सन्मान

यामध्ये वर्गीकृत कचरा संकलन – कचऱ्याचे वर्गीकरण आणि संकलन करणे, सार्वजनिक क्षेत्रातील साफसफाई करणे, सिंगल युज प्लास्टिकचा कमी वापर किंवा बंदी, (PCMC News) महापालिकेच्या सफाई कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देणे, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान प्रत्येक महिन्याला किमान एक शून्य कचरा कार्यक्रम राबविणे, नॉन बल्क जनरेटर्सद्वारे साईटवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे तसेच बल्क जनरेटर्सद्वारे साईटवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशा निकषांच्या आधारावर त्यांचे मुल्यांकन करण्यात आले असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक  जळक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.