Chinchwad :  कामांमध्ये समानता, सुसूत्रतेसाठी अभियंत्यांची कार्यशाळा  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामांमध्ये समानता व सुसूत्रता राखण्याच्या दृष्टीने स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिसारण व विद्युत विभागाकडील (Chinchwad) अभियंत्यांची  कार्यशाळा आज (शुक्रवारी) पार पडली. महापालिकेला देशातील इतर शहरांमध्ये अग्रेसर ठेवण्याची इच्छा आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका आयुक्त सिंह आणि सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते झाले.  सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, मनोज सेठिया, रामदास तांबे उपस्थित होते.

आयुक्त सिंह यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगत पालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने केलेल्या कामांचे उदाहरण देत माहिती दिली. इतर विभागांनी त्याप्रमाणे विकास कामे करत महापालिकेस देशातील इतर शहरांमध्ये अग्रेसर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. सह पोलीस आयुक्त शिंदे यांनी शहरात काम करत (Chinchwad) असताना आलेल्या अनुभवाची तसेच न्यायालयातील प्रकरणांमधील आदेशांचे उदाहरण देत कायदेशीर तरतुदी विशद केल्या. या तरतुदींचा वापर करत रस्त्यांची व पादचा-यांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक माहिती दिली.

 

Pune Crime : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीच्या तब्बल 162 दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकासासह तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगाची उभारणी चालु असल्याने त्यास पुरक असे पायाभूत सोयी सुविधाची कामे चालू आहेत. त्यामध्ये रस्ते, पदपथ, उद्याने, सुविधा इमारती इ. कामे चालू व नियोजित आहे. भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार व आयोजित विविध उपक्रमांतर्गत शहरात अर्वन स्ट्रीट डिलाईननुसार कामे चालु असून तसेच नष्याने देखील कामे करणेचे नियोजित आहे.

कार्यशाळेच्या प्रारंभी प्रमोद ओंभासे यांनी कार्यशाळा आयोजित करण्याचे प्रयोजन विशद करत माहिती दिली. वाहतूक नियोजन सल्लागार प्रसन्न देसाई, आर्किटेक्ट प्रांजली देशपांडे, अर्बन प्लॅनर प्रताप भोगले, ट्रान्सपोर्ट प्लॅनर संस्कृती मेनन, सेंटर फॉर एन्वायरमेंट एज्युकेशन यांनी शहरातील रस्ते, पादचारी,(Chinchwad) सायकलस्वार स्नेही करण्याकरीता तसेच सुरक्षित करण्यासाठी करण्यात येणा-या नियोजनाबाबत सादरीकरण केले.  पालिकेच्या अधिकारी / अभियंता व वाहतुक पोलिस अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या शंकाबाबत चर्चा करून निरासन केले आहे.

कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता सुनिल पवार, कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे यांनी नियोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.