Pune Crime : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीच्या तब्बल 162 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. पुणे शहर आणि ग्रामीण परिसरातून चोरट्यांनी चोरून नेलेल्या तब्बल 162 दुचाकी जप्त केले आहेत.(Pune Crime) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 कडून 54 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मागील काही वर्षात गुन्हे शाखेच्या पथकाची वाहन चोरी करणाऱ्या विरुद्धची सर्वात मोठी कारवाई समजली जाते. गुन्हे शाखेतील युनिट सहा, पाच, चार, दोन आणि दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दुचाकी चोरट्यांच्या मागावर होते.

याप्रकरणी सचिन प्रदीप कदम (वय 32, रा. कळंब, धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (वय 32, रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (वय 28, रा. गोविंदपूर, ता. कळंब, जि. धाराशिव), युवराज सुदर्शन मुंढे (वय 23, रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) या दुचाकी चोरांना सर्वप्रथम पकडण्यात आले होते. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी पुणे शहर आणि परिसरात दुचाकी चोरण्याची कबूल केली.

Pune : नियमभंग करणाऱ्या ‘त्या’ पबवर कारवाई करा; प्रदीप नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

या दुचाकी विक्री करण्यासाठी त्यांनी आरोपी अजय शेंडे, शिवाजी गरुड यांना विक्रीसाठी दिल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी पुण्यातील दुचाकींची लातूर, धाराशिव, बीड परिसरात (Pune Crime) विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुचाकींची कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून या चोरट्यांनी दुचाकीची स्वस्तात विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.