PCMC : पंचप्रण शपथने ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाला प्रारंभ

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या (PCMC) अभिमानासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर आणि वीरांगणांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाभिमान, कर्तव्यदक्षता आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवण्याची पंचप्रण शपथ आज (बुधवारी) महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली.

महापालिकेच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून मेरी माटी मेरा देश अभियानाचा प्रारंभ अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचप्रण शपथ घेऊन झाला. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास शहर अभियंता मकरंद (PCMC) निकम, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता रामदास तांबे, संजय कुलकर्णी,

बाबासाहेब गलबले, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मिनीनाथ दंडवते, अजय चारठणकर, संदीप खोत, मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष  अधिकारी किरण गायकवाड, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, महासंघाचे सर्व पदाधिकारी तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी, जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच (PCMC) क्रांती दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे प्रथम अध्यक्ष दिवंगत शंकरअण्णा गावडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह अधिकारी आणि महासंघाचे पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिवंगत शंकरअण्णा गावडे यांनी महासंघाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला.

आपल्या माती विषयी प्रेम व्यक्त करत मातीसाठी झटणाऱ्या शुरवीरांना अभिवादन करून हातात दिवे घेऊन उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली. भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प या शपथेद्वारे घेण्यात आला.

गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्याची आणि भारताची एकात्मता बलशाली करण्याची तसेच देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगण्याची पंचप्रण शपथ उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करण्याचा दृढ संकल्प देखील यावेळी करण्यात आला.

प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.

यामध्ये शिलाफलक, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन, सामुहिक ध्वजारोजन कार्यक्रम, हर घर तिरंगा अभियान, नागरी सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. वीर आणि वीरांगणांना तसेच मातृभूमीला वंदन करण्यासाठी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, मेरी माटी मेरा देश अभियानातंर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्येही पंचप्रण शपथ कार्यक्रम घेण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरणकुमार मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुक्रमे अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ (PCMC) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.