Pune : हरी नरके यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार 

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीनी घेतले अंत्यदर्शन

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले (Pune) यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे आज मुंबईत हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी 7 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर 8 वाजून 58 मिनिटांनी त्यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत. छगन भुजबळ यांनी हरी नरके यांच्या पत्नी संगिता नरके, कन्या कु.प्रमिती नरके, भाऊ लक्ष्मण नरके, ईश्वर नरके, दत्तात्रय नरके, सुदाम नरके आणि पुतणे विष्णू नरके यांचे सांत्वन केले.

 यावेळी आमदार कपिल पाटील, माजी खासदार समीर भुजबळ,माजी आमदार उल्हास पवार,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले की, हरी नरके हे समाजासाठी वैचारिक आधारस्तंभ होते. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, इतिहास अतिशय बारकाईने अभ्यास करुन समाजासमोर आणले. सावित्री बाई फुले यांचे जन्मगाव असलेले नायगाव येथे त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीनुसार तत्कालिन दिसणाऱ्या घराची राज्य शासनाने बांधणी केली आहे.

PCMC : पंचप्रण शपथने ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाला प्रारंभ

त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथाचे आज हिंदी,इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. देश विदेशात त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी भाषणे केली. त्यांच्या  निधनाने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हरी नरके हे भोपाळ येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांचे वजन वाढल्याचे सांगितले. शरीरामध्ये पाणी वाढले आहे आणि ते काढावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्यांचे पुढील 20 दिवसात 20 किलो वजन कमी झाले. त्या उपचारानंतर हरी नरके मला भेटले.  त्यावेळी ते खूप अशक्त दिसून आले. त्यावर आपल्या येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू केले. पण आज आपल्यातून चळवळीच्या मागे कायम उभा राहणारे हरी नरके हे निघून गेले आहे. याचे मला कायम दु:ख राहील.

त्या घटनेनंतर सोशल मीडियावर काही हरी नरके यांच्या उपचाराबाबत मेसेज व्हायरल झाले आहेत. ते मेसेज मला देखील हरी नरके यांनी केले होते. त्याच दरम्यान आपल्या येथील डॉक्टरांकडे हरी नरके यांच्यावर उपचार सुरू केले होते. 50 डॉक्टर त्यांना येऊन बघत होते आणि त्याला वर्ष झाले. त्यामुळे मी त्यावर जास्त बोलणार नाही. पण जामनगरमध्ये जाऊन 20 किलो वजन घटले तिथेच मला शंका आली होती. अशी कुठली औषध दिले त्यांना की 20 दिवसात 20 किलो वजन कमी झाले , असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित (Pune)  केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.