Chinchwad : संभाजी भिडेंविरोधात उद्या चिंचवडमध्ये मोर्चा

एमपीसी न्यूज – वादग्रस्त वक्तव्यांबाबत गुन्हे दाखल होऊनही संभाजी भिडेंना (Chinchwad) अटक करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ  पिंपरी-चिंचवडमध्ये विविध राजकीय पक्ष आणि शंभरावर सामाजिक संघटना गुरुवारी (दि.10) सकाळी थेट पोलीस आय़ुक्त कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.

 परवानगी मिळाली नाही, तरी हा मोर्चा काढण्य़ावर संभाजी ब्रिगेड  ठाम आहे. भिडे सातत्याने देशविघातक तसेच जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य  करीत असूनही सत्ताधारी त्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी नाराजी व्यक्त केली.

भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,तसेच त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार (Chinchwad) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.