Yerawada : येरवडा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडले; तुरुंगाधिकाऱ्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

एमपीसी न्यूज – कारागृह विभागाच्या (Yerawada) कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असून, सातत्याने कारागृहात कैद्यांकडे मोबाईल मिळून येत आहेत. आता पुन्हा एकदा येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे दोन मोबाईल आढळून आले आहेत. यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तालीम आस मोहमद खान ,राजू तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, आकाश उत्तम रणदिवे या कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे (वय 54) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा नोंद झालेले कैदी न्यायाधीन बंदी (कच्चे कैदी) आहेत. येरवडा कारागृहात अधिकारी गस्त घालत होते. त्यावेळी तालीम खान मोबाइल वापरत असल्याची माहिती मिळाली.

Chinchwad : संभाजी भिडेंविरोधात उद्या चिंचवडमध्ये मोर्चा

त्यानंतर अधिकाऱ्यांना खानची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे मोबाइल आणि बॅटरी सापडली. 6ऑगस्ट रोजी सकाळी अधिकारी व कर्मचारी येरवडा कारागृहातील रुग्णालय, टिळक विभागात गस्त घालत होते. त्यावेळी कैदी मोबाइल वापरत असल्याची माहिती मिळाली.

तत्काळ बराकीतील कैदी राजू अस्वले, सचिन घोलप, आकाश रणदिवे यांची झडती घेतली. तेव्हा अस्वलेकडे मोबाइल, बॅटरी, सीमकार्ड मिळाले. येरवडा कारागृहात यापूर्वी मोबाइल सापडले होते.

किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेची गंभीर दखल घेऊन कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी तत्कालिन अधीक्षक राणी भोसले यांची ठाणे कारागृहात बदली केली होती.

त्यानंतर कारागृहातील कैद्यांकडे मोबाइल सापडल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्था कुचकामी (Yerawada) असल्याचे आढळून आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.