PCMC : महिलांसाठी पालिकेच्या ‘या’ योजना; 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC)  समाज विकास विभागामार्फत  महिला व बालकल्याण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

मर्यादित कालावधीकरीता असणाऱ्या योजनेमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थीनींना सायकल घेण्यासाठी 7 हजार रुपये अर्थसहाय्य, सामाजिक संस्थांना सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी 25 हजार रुपये, सन्मानपत्र आणि  स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. लोकनायक गोपीनाथ मुंडे 12  वी नंतरचे प्रथम वर्ष वैद्यकीय योजनेंतर्गत (एम .बी. बी. एस/ बी. ए. एम. एस / बी. एच. एम. एस / बी. डी. एस / बी. यु. एम. एस)

बी.आर्किटेक्चर / बी. पी. टी. एच / बी. फार्म / बी. व्ही. एस. सी  आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी 25 हजार रुपये तर रामभाऊ म्हाळगी योजनेंतर्गत मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी आय. टी. आय विद्यार्थ्यांना 3 हजार रुपये आणि अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांना 7  हजार 500  रुपये तसेच महाराष्ट्र राज्य मंडळ (एस.एस.सी बोर्ड ) अंतर्गत शाळांमधील इयत्ता 10 वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी 6 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

BJP : पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल; चिंतन बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

वर्षभर खुल्या असणाऱ्या योजनांमध्ये स्व. प्रमोद महाजन योजनेंतर्गत परदेशातील उच्चशिक्षण / अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतीस प्रथम वर्षासाठी 1 लाख 50  हजार रुपये आणि अटलबिहारी वाजपेयी योजनेंतर्गत  विधवा / घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजनेतर्गत प्रशिक्षण घेतले असल्यास 25 हजार रुपये किंवा  प्रशिक्षण घेतले नसल्यास 15 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेंतर्गत पहिल्या मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस  25  हजार रुपये मुदत ठेव स्वरूपात देण्यात येणार आहे.

मदर तेरेसा योजनेंतर्गत नोंदणीकृत महिला संस्थांना / महापालिकेकडील नोंदणीकृत अनुदान प्राप्त महिला बचतगटांना पाळणाघर सुरू करण्याकरिता प्रारंभिक मुलभूत खर्चासाठी 10 हजार रुपये आणि त्यानंतर इतर खर्चासाठी दर सहामाहीस 12 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना 25 हजार रुपये तर महर्षी धोंडो केशव कर्वे योजनेअंतर्गत  विधवा महिलांच्या मुलींना संसार उपयोगी साहित्य घेणेसाठी 25  हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याच योजनेअंतर्गत विधवा महिलांकरिता पुनर्विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

6  महिने पुर्ण झालेल्या महिला बचतगटास तसेच 2 वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचतगटास 15 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या सर्व घटक योजनांचे अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून मुखपृष्ठावरील समाज विकास विभाग योजना या पर्यायावरून दिनांक 31  ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले (PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.