Maharashtra : चिंता महाविकास आघाडीच्या भवितव्याची नाही तर, देवेंद्र फडणवीसांची वाटते-सुषमा अंधारे

एमपीसी न्यूज-ठाकरे गटाची साथ सोडून शिंदें गटात गेलेल्या (Maharashtra) विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सुषमा अंधारेना उद्देशून  सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही,अशी टीका केली. या टिकेला उत्तर देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  सुषमा अंधारे यांनी चिंता महाविकास आघाडीच्या भवितव्याची नाही तर, देवेंद्र फडणवीस यांची वाटते असे वक्तव्य केले.

नीलम गोऱ्हे यांना सुषमा अंधारे आल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी नीलम गोऱ्हेंनी सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही, असं वक्तव्य केलं आहे.

PCMC : महिलांसाठी पालिकेच्या ‘या’ योजना; 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

त्यावर  सुषमा अंधारे म्हणाल्या,नीलम गोऱ्हे यांनी सटरफटर हा शब्द फक्त माझ्यासाठी नाही तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढणाऱ्या सर्वसामान्य सैनिकांबद्दल वापरला आहे.या शब्दाचा अर्थ मी त्यांना संविधानिक पद्धतीने समजावून सांगणार आहे.अशी टीका करणार्‍या नीलम ताईंनी स्वतः नगरसेवक म्हणून तरी निवडून येऊन (Maharashtra)  दाखवावं ,असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.