PCMC News : 3 हजार नागरिकांनी घेतला ऑनलाइन ना- हरकत दाखला

एमपीसी न्यूज – मालमत्ता कर थकीत (PCMC News) नसल्याचा ना-हरकत दाखला करदात्या नागरिकांना विविध कामासाठी लागत असल्याने महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने हा दाखला ऑनलाइन देण्यास सुरूवात केली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मागील 7 महिन्यात 3 हजार 56 नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने ना-हरकत दाखला घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 80 हजार मिळकती आहेत. 2022-23 या चालू आर्थिक वर्षांत कर आकारणी व कर वसूली विभागाने 1 हजार कोटींचे उद्दिष्टय ठेवले आहे. आर्थिक वर्षांतील 7 महिन्यात सुमारे 375 कोटींचा मिळकत कर वसुल झाला आहे. उद्दिष्टय पूर्ण करण्यासाठी कर संलकन विभागाने कंबर कसली असून जप्तीची मोहीम सुरू केली आहे. मिळकत कर विभागाने गेल्या वर्षभरात विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा करदात्यांना चांगला फायदा होत आहे. नवीन आर्थिक वर्षांपासून कर संकलन विभागाने ना- हरकत दाखल्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली असून अवघ्या 7 महिन्यांत 3 हजार 56 नागरिकांनी 10 रूपये शुल्क भरून दाखला घेतला आहे.

Talegaon Dabhade : रस्त्यावर अश्लिल हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा

याबाबत कर आकारणी व कर संकलन विभागाचे (PCMC News) सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, ”करदात्या नागरिकांना गृह कर्ज काढण्यासाठी, विविध शासकीय कामांसह विविध कामांना मिळकत कर थकीत नसल्याचा दाखला लागतो. यापूर्वी करदात्या नागरिकांना ना-हरकत दाखला काढण्यासाठी कर संकलन कार्यालयात यावे लागायचे. त्यामुळे करदात्यांचा वेळ आणि पैसे खर्च होत होते. मात्र, कर संकलन विभागाने दाखल्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली. त्यामुळे नागरिकांना घर बसल्या आणि कुठेही मोबाईलवरून ना-हरकत दाखला काढता येत आहे. त्यामुळेच ऑनलाइन दाखला काढणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.