Talegaon Dabhade : रस्त्यावर अश्लिल हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्यावर थांबून अश्लिल हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर करण्यात आली.

सचिन संजीवन शिंदे (वय 29, रा. विश्रांतवाडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 27 आणि 35 वर्षीय दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari extortion : पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लैंगिक हावभाव करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला.(Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.