Tulsi vivah : मंडईतील साखरे महाराज मठात तुळशीविवाह सोहळा थाटात संपन्न

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Tulsi vivah) सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आज (दि.5) तुळशीविवाहाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, संतोष रसाळ, गजानन धावडे, विजय चव्हाण, तानाजी शेजवळ, साखरे महाराज मठाचे वंदना मोडक, वनिता मोडक, सोनिया मोडक आदी उपस्थित होते.

शामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळ्याचे पौरोहित्य केले. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला.(Tulsi Vivah) तुळशी वृंदावन आणि श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन रथातून मिरवणूक काढण्यात आली. दरबार ब्रास बँड मिरवणुकीत वादन करत होते.

PCMC News : अस्वच्छता करणा-यांवर कारवाई; नऊ महिन्यात मिळाले सव्वा कोटी

चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करत, श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता.(Tulsi Vivah) समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर विवाह समारंभ झाला. उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण-तुलसीचे दर्शन घेतले.

भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.