PCMC News : अस्वच्छता करणा-यांवर कारवाई; नऊ महिन्यात मिळाले सव्वा कोटी

एमपीसी न्यूज – रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोडा टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे, कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणा-यांवर महापालिकेकडून  दंडात्मक कारवाई केली जाते.(PCMC News) त्याकरिता आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी ग्रीन मार्शल पथकांची नेमणूक करण्यात आली असून या पथकांच्यामार्फत महापालिकेला अवघ्या नऊ महिन्यांत तब्बल सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत.

औद्योगिकनगरी, कामगारनगरीकडून स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटीकडे शहराची वाटचाल होत असताना शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरातील अनेक नागरिक स्वच्छतेचे नियम मोडत असल्याने पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. दंडात्मक कारवाईसाठी महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ग्रीन मार्शल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Beaten case : हप्त्यासाठी चिकन दुकानदाराला बेदम मारहाण

या पथकांमार्फत गेल्या नऊ महिन्यात रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोड टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे,(PCMC News) कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणे यासह विविध नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतून महापालिकेला तब्बल सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत.

आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, ”नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एका ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांमार्फत नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.(PCMC News) गेल्या नऊ महिन्यांत या पथकाने सव्वा कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे. शहर स्वच्छ रहावे, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.