Nigdi Crime : तडीपार गुंडच धावून आला पोलिसांच्या अंगावर

एमपीसी न्यूज – तडीपार गुंडाला पकडायला गेले (Nigdi Crime) असताना आरोपीच पोलिसांच्या अंगावर धावून गेला व त्याने पोलिसांशी झटापट केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) रात्री संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम निगडी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शाहिद साजिद शेख (वय 27, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन सपकाळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC News : 3 हजार नागरिकांनी घेतला ऑनलाइन ना- हरकत दाखला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद शेख याला 10 जुलै 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी निगडी पोलिसांचे पथक गेले.

आरोपी शाहिद हा त्याच्या घराजवळ थांबला असता पोलीस त्याला (Nigdi Crime) ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने पोलिसांशी झटापटी केली. दमदाटी करून मारहाण करण्यासाठी तो पोलिसांच्या अंगावर धावून आला. याप्रकरणी शाहिद याला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.