Red Zone : शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचे रेडझोन हद्दीबाबतचे पत्र म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Red Zone) निगडी व निगडी विभागाच्या जवळच्या क्षेत्रातील रेडझोन सीमा निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात असताना शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी रेडझोन’ हद्दीबाबत दिलेले पत्र म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ मारण्याचे काम असल्याचे भाजपचे माजी नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे यांनी म्हटले आहे.

याबाबत केंदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार निगडी व निगडी विभागाच्या जवळच्या क्षेत्रातील नागरिकांना वारंवार भेडसावणार्या रेडझोनच्या प्रश्नसंदर्भात गेल्या पाच वर्षांपासून आम्ही प्रशासनाकडे योग्य तो पाठपुरावा करीत आहोत. आम्ही केलेल्या विनंतीवरून आमदार लांडगे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पिंपरी महापालिकेत दोन बैठका लावल्या होत्या. तसेच 05 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही दिलेला पत्राच्या आधारे पिंपरी महापालिकेत आयुक्त, नगररचना तसेच भूमी जिंदगी विभागातील अधिकाऱ्यांची दोन वेळा ‘समन्वयाची बैठक’ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांनी नगररचना विभागामार्फत रेड झोन संदर्भात नकाशे अध्यारोपण (super impose) करून रेड झोन बाबतची प्रकरणे वअभिप्राय देण्या संदर्भात निर्देश दिले होते.

Red zone : महापालिका कार्यक्षेत्रातील ‘रेडझोन’ हद्दीबाबतचे नकाशे तत्काळ प्रसिध्द करा- डॉ.नीलम गोऱ्हे

निगडी व निगडी विभागाच्या जवळच्या क्षेत्रातील रेडझोन मोजणीचे (Red Zone) हद्द कायम करण्यासाठीची कार्यवाही ही अंतिम टप्प्यात आहे. यामुळे कृष्णानगर, यमुनानगर,वाहतूक नगरी, निगडी-साईनाथनगर, से.नं.22, से.नं.24 प्राधिकरण (से.नं.20/21/22/23/24 ) मधील सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे, हे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी  दिसून येत आहे. डॉ. गोऱ्हे या महाराष्ट्रातील अभ्यासू नेत्या आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांच्या पत्रावरून त्यांना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, परंतु, त्यांनी दिलेल्या पत्रातून नेमकी स्पष्टता होत नाही. असे त्या पत्रातून लक्षात येते. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून गोऱ्हे यांनी दिलेल्या पत्रामुळे संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी, अशी विनंती केंदळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.