Red zone : महापालिका कार्यक्षेत्रातील ‘रेडझोन’ हद्दीबाबतचे नकाशे तत्काळ प्रसिध्द करा- डॉ.नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील रेडझोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र रेडझोन मध्ये येते, याची कोणतीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध नाही. (Red zone) त्यामुळे पिंपरी-चिंचवड हद्दीतील काही भागांत असलेल्या ‘रेड झोन’चे नकाशे व सर्व्हेची माहिती तत्काळ प्रसिद्ध करण्याबाबतचे  निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना त्यांची घरे विक्री करता येत नाहीत. मालमत्तावर कर्ज घेता येत नाही. जमीन विकसीत करता येत नाही. तसेच जुन्या बांधकामांचा पुनर्विकास ही करता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये घबराट ही आहे. याबाबत माझ्याकडे शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश मरळ यांनी डॉ. गोऱ्हे यांना निवेदन दिले होते. यावर डॉ. गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना रेड झोन’चे नकाशे व सर्व्हेची माहिती तत्काळ प्रसिद्ध करण्याबाबतचे  निर्देश दिले आहेत.

Vasundhara award : यंदाचा वसुंधरा सन्मान पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर

त्यामध्ये  निगडीतील सर्वे नंबर 56, 57 व 63 हे रेडझोन मध्ये येत असताना या सर्व्हे नंबर मधील शरदनगर मध्ये एसआरए प्रकल्प सुरू झाला आहे. (Red zone) याला जिल्हाधिकाऱ्यांनी हे क्षेत्र रेडझोन मध्ये येत नाही, असे पत्र दिले आहे. त्यामुळे कोणते क्षेत्र रेडझोन मध्ये, कोणते क्षेत्र बाहेर आहे याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे.तसेच शरदनगर मधील रेडझोनमध्ये ‘रेनबो डेव्हलपर’ यांना परवानगी कशी दिली गेली याबाबत ही चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच यमुनानगर, त्रिवेणीनर, चिखलीतील मोरे वस्ती, साने चौक हे रेड झोन क्षेत्रामध्ये येते का ? याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. त्यामुळे रेडझोन’ हद्दीबाबतचे नकाशे तत्काळ प्रसिध्द करावेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.