Talegaon Dabhade : ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते महापूजा

एमपीसी न्युज – कार्तिकी एकादशी निमित्त शुक्रवारी (दि. 4) तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या (Talegaon Dabhade) हस्ते काकड आरती आणि महापूजा करण्यात आली. शहर परिसरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी विठ्ठल मंदिरांमध्ये गर्दी केली. 

शाळा चौकातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात पहाटे मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांचे हस्ते काकड आरती आणी महापूजा करण्यात आली.यावेळी  मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Red zone : महापालिका कार्यक्षेत्रातील ‘रेडझोन’ हद्दीबाबतचे नकाशे तत्काळ प्रसिध्द करा- डॉ.नीलम गोऱ्हे

मंदिरात पहाटे काकड आरती,अभिषेक पूजा, भजन, महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी  ह.भ.प.पांडुरंग कार्लेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांचे किर्तन संपन्न झाले.(Talegaon Dabhade) किर्तनास  भाविकांनी उस्फूर्त गर्दी केली होती.

श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने  मंदिरात फुलांची सजावट,आणी  विजेची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच भव्य रांगोळी  काढण्यात आली होती.दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.