Pune news : अन त्यांचाही भरणार वधु वर परिचय मेळावा

एमपीसी न्यूज लग्न करणे किंवा त्यासाठी योग्य वधुवर शोधणे हा सर्वांचा अधिकार आहे. याच उद्देशाने पॉजीटीव्ह साथी फाऊंडेशन या संस्थेतर्फे (Pune news) खास एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आणि दींव्यांग व्यक्ती यांचा पुण्यात वधुवर परिचय मेळावा आयोजीत केला आहे.

हा मेळावा बालकल्याण सभागृह, राजभवन शेजारी,पुणे विद्यापीठ जवळ 26 व 27 नोव्हेंबर रोजी आयोजीत केला आहे. यामध्ये प्रवेश हा मोफत असणार आहे. मात्र यासाठी येत्या सोमवार (दि.7) 7 पासून 20 नोव्हेंबर पर्यंत एचआयव्ही संसर्गित व्यक्तींनी 7788991097 या HIV helpline फोन वर तसेच positivesathi.org  या वेबसाईटवर  नाव  नोंदणी करायवयाची आहे. सहभागी उमेदवारांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने संख्येचा अंदाज घेण्याकरिता ही अट घालण्यात आली आहे.

Talegaon Dabhade : ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते महापूजा

या मेळाव्यात 26 नोव्हेंबर रोजी एचआयव्ही सहीत जगणाऱ्या व्यक्तींसाठी (Pune news) तर दिव्यांग व्यक्तीसाठी 27 रोजी करिता positivesouls foundation या सेवाभावी संस्थेमार्फत मोफत वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुकांना पुढील क्रमांकावर एचआयव्ही सहीत जगणाऱ्यासाठी 7788991097 दिव्यांग व्यक्ती करिता 7400064447ऑनलाईन नोंदणी साठी  positivesouls.life  तसेच positivesathi.orgsoulsathi.org  मदतनीस म्हणून व्यक्ती अथवा संस्था यांची सुध्दा नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती डेप्युटी आरटीओ अनिल वळीव यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.