Vasundhara award : यंदाचा वसुंधरा सन्मान पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर

एमपीसी न्यूज यंदाचा वसुंधरा सन्मान पुरस्कार हा गिरीश प्रभुणे यांना दिला जाणार आहे. तर कोरोना महामारीच्या संकटानंतर जलदिंडी प्रतिष्ठान वसुंधरा क्लबच्या (Vasundhara award) सहयोगाने 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 हा पिंपरी-चिंचवड येथे भरवला जाणार आहे.

या वर्षीचा महोत्सव हा 4 दिवसांचा असून यंदा महोत्सवाचा विषय हा सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा आहे. महोत्सवास सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश  असणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन 9 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जे.एस.पी. एम. महाविद्यालय ताथवडे येथे होणार असून महोत्सवात पुरस्कार गिरीश प्रभुणे (किर्लोस्कर वसुंधरा सन्मान), देवदत्त कशाळीकर(किर्लोस्कर वसुंधरा मित्र, छायाचित्रकार), पितांबर लोहर (किर्लोस्कर वसुंधरा इको जर्नलिस्ट), डॉ. श्रीकृष्ण जोशी (किर्लोस्कर वसुंधरा मित्र), निसर्गराजा मैत्र जीवांचे (किर्लोस्कर वसुंधरा मित्र संस्था), आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल (किर्लोस्कर वसुंधरा मित्र संस्था) हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

MPC News Podcast 5 November 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

याप्रसंगी पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, चिफ ऑफ के.पी.एल. आनंद चितळे, सी.इ.ओ. विलो मैथर अॅण्ड प्लट हेमंत वाटवे, चिंचवड देवस्थान विश्वस्त मंदार महाराज,जे.एस.पी.एम. संचालक डॉ. आर. के. जैन व डॉ. रवी जोशी, सी.इ.ओ.(Vasundhara award) आदित्य बिर्ला हॉस्पिटल रेखा दुबे, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव व जलदिंडी प्रतिष्ठान विश्वस्थ डॉ. विश्वास येवले उपस्थित रहाणार आहेत.

महोत्सवाचा समारोप आणि महोत्सवातील पुरस्कार प्रदान सोहळा 12 नोव्हेंबर रोजी क्वालिटी सर्कल, एक्सलन्स सेंटर भोसरी येथे सपन्न होणार असून यावेळी आ. महेश दादा लांडगे, (Vasundhara award) आमदार सुनिल शेळके, मनोज कुमार फुटाणे एम.डी. कलाग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, लायन राजेश कोठावडे डिस्ट्रिक गव्हर्नर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात वसुंधरा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

 

महोत्सवात काय-काय असेल –

महोत्सवा दरम्यान शॉर्ट फिल्म व बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. महोत्सवा दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहे.ग्रीन बझार व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व विक्री हे महोत्सवाचे खास आकर्षण असून हे प्रदर्शन मोरया गोसावी

मंदिराच्या शेड मध्ये भरविण्यात येणार आहे.महाविद्यालयीन विद्यार्थीथांसाठी आयडीया चॅलेंज 2022 हे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.महाविद्यालयीन विद्यार्थीसाठी व नागरीकांसाठी महोत्सवाच्या विषयाला अनुसरून रोज चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच या महोत्सवात जलदिंडी प्रतिष्ठान तर्फे रिव्हर पोलीस या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.