Pimpri : पिंपळे गुरव येथे स्वच्छता आभियान आयोजित

एमपीसी न्यूज –  पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान व शेजारील परीसरामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व सामाजिक संस्थांच्या वतीने स्वच्छता आभियान राबविण्यात आले.(Pimpri) यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एक कदम स्वच्छता की और स्वच्छतेकडून समृद्धीकडे असे सांगत स्पीकरद्धारे आपला परीसर स्वच्छ करून पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी नागरिकांना मोकळ्या जागेत कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन केले. तसेच ओला कचरा ,सुका कचरा,व घातक कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासही सांगितले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका , टीम बेसिक्स , नवचैतन्य हास्य क्लब , दिलासा संस्था , मानवी हक्क संरक्षण संस्था, सदिच्छा महिला गट अशा अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवून परीसर स्वच्छ केला. तसेच शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी तुमचे सहकार्य व तुमची मदत खूप लाख मोलाची आहे. असे सांगून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर करू या ही माहिती सांगून जनजागृती करण्यात आली.

Wrestler Protest : मोदी सरकारचा महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर;तीव्र निषेध – महेश तपासे

आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपले योगदान द्यावे.  तसेच स्वच्छ्ता मोहीमेत जास्तीत जास्त युवकांनी तसेच सर्व नागरिकांनी यात आपला सहभाग घेतला तर आपण आपला परिसर , शहर स्वच्छ आणि सुंदर ठेऊ आणि  स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये आपले शहर देशात नंबर एक वर घेऊन जाऊ शकतो असे जोगदंड यांनी यावेळी सांगितले . टीम बेसिक्स वॉर्ड इंचार्ज श्रीराम डुकरे यांनी उपस्थित नागरिकांना एक कदम स्वच्छता की और स्वच्छतेकडून समृद्धीकडे अशी स्वच्छतेची शपथ दिली.

यावेळीमानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, गजानन धाराशिकर,मुरलीधर दळवी, पि.एस. आग्रवाल, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,अरविंद मांगले, सुभाष चव्हाण, सफाई कर्मचारी,   बेसिक्स संस्थाचे वाॅर्ड इंचार्ज  श्रीराम डुकरे,राखी वाजाणी सह अनेक नागरिक स्वयंम स्फुर्तीने सहभागी झाले होते. ,ड क्षेत्रीय अधिकारी  उमाकांत गायकवाड , ए. एच.ओ. महेश आढाव , एस.आय. बी.आर.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पृथ्वी/ वसुंधरा सप्ताह दिनानिमित्त स्वच्छता प्लाॅगेथॅान राबवण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.