Pune : ‘शुक्रतारा’ या सांगीतिक कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

एमपीसी न्यूज – अतुल अरुण दाते व अभय गाडगीळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवार दि 11 मे रोजी सायं 5.30 वाजता, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे स्व. अरुण दाते यांच्या अजरामर गीतांच्या ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune) अरुण दाते यांच्या जयंतीचे औचित्य साधत सदर कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे यांना या वर्षीच्या अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येईल. रामुभैय्या दाते स्मृती प्रतिष्ठान व पी एन गाडगीळ एक्सक्लुझिव्ह – नळ स्टॉप यांच्या वतीने या वर्षीचा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

Pimpri : पिंपळे गुरव येथे स्वच्छता आभियान आयोजित

‘शुक्रतारा’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सारंग पाडळकर, श्रीरंग भावे, सुप्रसिद्ध गायिका पल्लवी पारगांवकर, वर्षा जोशी व अंजली मराठे हे प्रमुख गायक कलाकार असणार असून प्रसन्न बाम, अमित कुंटे, अभय इंगळे व केदार परांजपे हे सहकलाकार असतील. (Pune) कार्यक्रमाचे निवेदन हे सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुश्री फडणीस करणार असून स्वतः अतुल अरुण दाते हे उपस्थितांशी संवाद साधत अरुण दाते यांच्या आठवणींना उजाळा देतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.