Pimpri : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपकडून लढले तर प्रचार करणार का? आढळराव म्हणाले..

एमपीसी न्यूज – शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये येतात की नाही माहित नाही. त्यांची भाजपशी जवळीक वाढली असेल. पण, शिरुरची जागा शिवसेनेची आहे.(Pimpri) ते भाजपमध्ये आले आणि कोणत्या मतदारसंघातून लढतात, यावर त्यांचा प्रचार करणार की नाही हे अवलंबून असेल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली. यावेळी इरफान सय्यद उपस्थित होते.

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना आढळराव म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये येतात की नाही माहित नाही. त्यांची भाजपशी जवळीक वाढली असेल. कोल्हे भाजपमध्ये आले. तर, चांगली गोष्ट आहे. शिवसेना-भाजप युती वाढावी हीच आमची भूमिका आहे. मला काही अडचण नाही. पण, शिरुरची जागा शिवसेनेची आहे. भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हे यांची समजूत काढावी. त्यांना निवडणूक लढविण्यापासून थांबवावे. मी तर निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.

 भाजप-राष्ट्रवादी एकत्र येईल असे दिसत नाही.(Pimpri) पण, ते एकत्र आले. तरीही शिवसेनेवर काही  परिणाम होणार नाही. भाजप-शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. तर, चांगले होईल. त्याचा आम्हाला आनंद होईल, असेही ते म्हणाले.

भोसरीतील अनेक प्रश्न रखडले आहे. त्या प्रश्नांना गती देण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या आहेत. त्यामुळे भोसरीतील कामांना गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.