PCMC :  विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अखत्यारीत (PCMC) येणाऱ्या शहरातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवी कोरी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 99 हजार 391 पुस्तकांची मागणी करण्यात आली असून पुस्तके पालिकेकडे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली.

यंदा 13 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेच्या वतीने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश व एक स्वेटर तसेच, इतर शालेय साहित्य दिले जाते. मात्र, आगामी शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना फक्त गणवेश देण्यात येणार असून शालेय साहित्यासाठी विद्यार्थी अथवा पालकांच्या बॅंक खात्यात पैसे टाकण्यात येणार आहेत म्हणजे (डीबीटी) करण्यात येणार आहे.

Mahalunge : पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

दुसरीकडे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यासाठी महापालिका शिक्षण विभागाने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शहरातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीकडे 99 हजार 391 पुस्तकांची मागणी केली होती.

शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, असे विभागाकडून सांगण्यात आले. पुस्तकांची छपाई केली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारतीकडून महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या उन्नत केंद्रावर पुस्तके उपलब्ध करून दिल्यावर जून महिन्यात 20 केंद्रांवरून ती वितरित करण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवीकोरी पुस्तके पडणार (PCMC) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.