PCMC : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे महापालिकेस विविध सन्मान – अतिरिक्त आयुक्त जगताप

एमपीसी न्यूज – आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी (PCMC) महापालिकेसाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे, प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे महापालिका विकासाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे, तसेच महापालिकेस विविध सन्मान प्राप्त होत असून पालिकेच्या लौकीकात भर पडत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते माहे जून 2023 अखेर सेवानिवृत्त होणा-या 34 तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 1 अशा एकूण 35 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी महादेव बोत्रे, मंगेश कलापुरे, नथा माथेरे, चारूशिला जोशी, विजया कांबळे, शेखर गावडे, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Pune : जीएसटी अँड कस्टम्स, मध्या रेल्वे उपांत्य फेरीत

माहे जून 2023 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या 34अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, उपअभियंता शहाजी गायकवाड, मुख्याध्यापिका सुरेखा चोपडे, लेखापाल प्रविणकुमार देठे, भांडारपाल भास्कर रिकामे, मुख्य लिपीक ज्ञानेश्वर पिंगळे, जयकिसन कुंजीर, स्टाफ नर्स सीमा पवार, फार्मासिस्ट (PCMC) रमेश तापकीर, उपशिक्षिका कुमुदिनी मदने, उपशिक्षक कुमुद शिंदे, लिपीक अनिल राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक महादेव व्हटे, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट राजेंद्र नागपुरे, मिटर निरीक्षक अशोक भोसले, प्रमुख अग्निशमन विमोचक तानाजी चिंचवडे, अशोक इंगवले, क्रिडा पर्यवेक्षक सुभाष पवार, वीज पर्यवेक्षक राजेंद्र निपुंगे, दूरध्वनी पर्यवेक्षक निशिगंधा वारंग, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर रावण कसबे, वायरलेस ऑपरेटर गोरक्षनाथ विरकर, वाहनचालक अरूण भोसले, नारायण तापकीर, शहाजी भोसले, रखवालदार रंगनाथ वाल्हेकर, प्लंबर अनिल भोईर, मजूर शशिकांत हुलावळे, प्रकाश काटे, राजेंद्र पडवळ, सफाई कामगार चिंधू पारखी, वसंता नैनार, सफाई सेवक विमलाबाई वाल्मिकी, गटरकुली दिलीप केदारी यांचा समावेश आहे.

तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार कमल ओव्हाळ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.