Pune : जीएसटी अँड कस्टम्स, मध्या रेल्वे उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज – जीएसटी अँड कस्टम्स, पुणे (Pune) आणि मध्या रेल्वे संघांनी डॉ. आंबेडकर निमंत्रित हॉकी मोठ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Pimpri News : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात आज तलेब शाह च्या पाच गोलच्या जोरावर जीएसटी अँड कस्टम्स संघाने हॉकी लवर्स संघाचा 8-0 असा पराभव केला. हरीश शिंडगी, धरामविर यादव, प्रणव माने यांनी अन्य goal केले. विश्रांतीला जीएसटी अँड कस्टम्स संघाकडे 2-0 आघाडी होती.

 

अन्य एका सामन्यात मध्य रेल्वे संघाने किड्स संघाचा 12-0 असा पराभव केला. विनीत कांबळे ने चार, आदित्य रसाळ ने तीन,  तरूष सिंग ने दोन आणि गोविंद नाग, स्टीफन स्वामी, रूबेन केसरीने प्रत्येकी एक गोल केला. विश्रांतीला मध्य रेल्वेने 7-0 अशी मोठी आघाडी घेत सामन्याचा निकाल जवळ जवळ निश्चित केला होता.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.