Pimpri News : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकामध्ये आज (शुक्रवारी, दि. 30) दुपारी अडीच वाजताच्या  सुमारास अपघात झाला. डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Nigdi News : पिंपरी चिंचवड जैन समाजातर्फे चातुर्मास मंगल प्रवेश व शोभा यात्रा

पूनम सतेद्र रातुरी  (वय 41 रा. यश संकुल सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पुनम त्यांच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. कोकने चौकात विरुद्ध दिशेने जात असताना एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

चौकात कायम वाहतूक कोंडी

कोकने चौक हा कायम रहदारी असलेला चौक आहे. या चौकामध्ये सिग्नलचा अभाव असून आजूबाजूला बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. त्यातच या परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाने आण करण्यासाठी पालकांच्या तसेच शाळांच्या  वाहनांची रांग असते. यामुळे चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.