Pimple Gurav :लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील श्री लक्ष्मण नागरी सहकारी (Pimple Gurav) पतसंस्थेने आपल्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर केला असून, आज झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी याबाबतची घोषणा केली.

पतसंस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी सभेच्या (Pimple Gurav)अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप होते. तसेच ज्येष्ठ सभासद चंद्रकांत लिमकर, उत्तम गीते, रमाकांत बहिरट, साहेबराव आढाव, अनिल आहेर यांच्यासह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

Pune : देवेगौडा – भाजपा युतीला महाराष्ट्र जनता दलाचा ठाम विरोध; समविचारी पर्यायाबाबत लवकरच निर्णय घेणार

या सभेचे प्रास्ताविक महादेव रोकडे यांनी केले. संस्थेचे सचिव प्रा. सुरेश धाडीवाल यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी सुनील कदम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.