Ravet : भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या वतीने पवनेच्या काठावर स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर रोजी स्वच्छता (Ravet) मोहीम राबविण्याच्या आवाहनाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम केंद्र पुणे यांच्या वतीने देखील रावेत येथे चार ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमात एक ऑक्टोबर रोजी सर्वांनी(Ravet)) एक तास स्वच्छता करून गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला महात्मा गांधीजींना स्वछांजली अर्पित करावी, असे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम केंद्र पुणे यांच्या वतीने रविवारी (दि. 1) सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत पवना नदी किनारी रावेत येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Pune : फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या चोरांना बेड्या

स्वच्छतेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये भारतीय प्राणी सर्वेक्षण (Ravet)पश्चिम केंद्र पुणे येथील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक माजी नगरसेवक, महापालिका कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. त्यानंतर पदयात्रा काढून स्वच्छतेचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.

पदयात्रेदरम्यान रस्त्याच्या बाजूला पडलेले प्लास्टिक आणि इतर(Ravet) कचरा जमा करण्यात आला. पवना नदीच्या किनारी असलेल्या विसर्जन घाटावर स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम महाराज ब्रिजवर स्वच्छता केली. देश के सच्चे हिरो या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

ओला आणि सुका कचरा जमा करून तो महापालिकेच्या वाहनात भरून दिला. भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम केंद्र पुणे यांनी राबविलेल्या या स्वच्छता मोहितेबाबत स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.