Alandi : ‘एक तारीख, एक तास श्रमदान, मोहिमेला आळंदीतून उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज :आळंदी येथे दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत(Alandi) स्वच्छता पंधरवाडा, स्वच्छता ही सेवा2023 हा उपक्रम राबविण्यात येत असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. 1 ऑक्टोबर रोजी एक तारीख – एक तास हा स्वच्छता उपक्रम आळंदीत राबविण्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 1500 पेक्षा जास्त नागरिक मोहिमेत सहभागी झाले असून 9 टन कचरा संकलित करण्यात आला.

शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक, धर्मदाय संस्था, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, बचत गट यांना स्वच्छता पंधरवाडा – स्वच्छता ही सेवा 2023 या उपक्रमा अंतर्गत दि. 1 ऑक्टोबर रोजी शहरातील सिध्दबेट,कुबेर गंगा परिसर, इंद्रायणी नदी घाट,भाजी मंडई, नगरपरिषद आळंदी इंद्रायणी नगर नदी काठ,केंद्रे महाराज मठ मागील परिसर,चाकण चौक परिसर,काळे पेट्रोल पंप शेजारील पुणे रस्ता परिसर यापैकी कोणत्याही एका ठिकाणी सकाळी 10.00वाजल्यापासून  श्रमदान करण्याचे आळंदी नगरपरिषदे मार्फत आवाहन केले होते.

Pune : मोहन जोशी यांनी घेतली तब्बल 400 गणपती मंडळांची भेट

त्याला विविध संस्था, नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत त्यात ते सहभागी झाले व शहरातील विविध भागातील स्वच्छता नागरिकांनी यावेळी केली.

तर भाजी मंडईमध्ये आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या सह पालिकेच्या आधिकारी व कर्मचाऱ्यां सुद्धा या मोहिमेत श्रमदान केले.व आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 1,2,3,4 च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृदांनी आपल्या शाळेचा परीसर स्वच्छ करून श्रमदान करत ही मोहीम यशस्वी रित्या राबवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.