Pune : मोहन जोशी यांनी घेतली तब्बल 400 गणपती मंडळांची भेट

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या विविध भागातील सुमारे 400 (Pune) गणपती मंडळांना माजी आमदार व ज्येष्ठ नेते मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर व कार्यकर्त्यांसोबत भेटी दिल्या.

गणेशोत्सवात पाऊस देखील बऱ्यापैकी झाला. त्यामुळे कधी चालत, दुचाकीवरून तर कधी रिक्षाने फिरून गणपती मंडळांना भेटी दिल्या व गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. राज्यावर असणारे कोरड्या दुष्काळाचे संकट दूर व्हावे व बळीराजाला दिलासा मिळावा असे साकडे गणपती बाप्पाच्या चरणी घातले आहे.

देशभरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली असल्याने पुण्यातील गणेशोत्सवाला वेगळे महत्त्व असते.

Alandi : शरद पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाचे उद्घाटन

देशभरातून नागरिक पुण्याचे गणपती पाहायला येतात. यंदाही लाखो गणेशभक्तांनी पुण्यातील बाप्पांचे दर्शन घेत, देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळीनी (Pune) मानाच्या गणपतींना भेटी दिल्या.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील, कृष्णा साठे, चेतन आग्रवाल, आयुब पठाण, महेंद्र चव्हाण, सुरेश कांबळे, ज्ञानेश्वर जाधव, अक्षय थोरात या सहकारी व कार्यकर्त्यांसमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या गणपतींसह तब्बल 400 गणपती मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.