Talavade : शॉर्टसर्किटमुळे फेब्रीकेशनच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज – तळवडे येथील फेब्रीकेशनच्या दुकानाला आग (Talavade) लागली. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणीनगर, तळवडे येथील सरस्वती विद्यालय आणि गगनगिरी मठाजवळ असलेल्या फेब्रीकेशनच्या दुकानाला आग लागल्याची वर्दी अग्निशमन विभागाला मिळाली.

त्यानुसार तळवडे अग्निशमन उपकेंद्र आणि पिंपरीतील संत तुकाराम नगर अग्निशमन मुख्यालयातील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर त्वरीत नियंत्रण मिळविले. या (Talavade) आगीत प्लायवुड तसेच इतर लाकडी साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्‍यता अग्निशमन दलाच्या सूत्रांनी व्यक्‍त केली.

Pune : मोहन जोशी यांनी घेतली तब्बल 400 गणपती मंडळांची भेट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.