Talavade : महिलेच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली.(Talavade)त्यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास तळवडे चौकात घडला. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तानाजी नागनाथ जगताप (वय 57, रा. महाळुंगे, ता. खेड) असे गुन्हा दाखल (Talavade)झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मयूर श्रीधर भालेकर (वय 29, रा. तळवडे गावठाण) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Punavale : पुनावळे येथील कचरा डेपो विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखळी उपोषणाला आयटीयन्सचा पाठींबा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 22 वर्षीय चुलत बहिण आणि त्यांची नातेवाईक महिला (वय 41) तळवडे येथून निगडीकडे दुचाकीवरून कामानिमित जात होत्या. तळवडे चौकात जगताप याने त्याच्या ताब्यातील ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांच्या नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांची चुलत बहिण जखमी झाली.

अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावर ट्रक सोडून पळून गेला. हा अपघात झाल्यानंतर तळवडे चौकात मोठा गोंधळ झाला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. ग्रामस्थांनी तळवडे बंदची देखील हाक दिली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढण्यात आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.