Punavale : पुनावळे येथील कचरा डेपो विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखळी उपोषणाला आयटीयन्सचा पाठींबा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या (Punavale)अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा चौथा दिवस होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुनावळे येथे रहिवासी भागात कचरा डेपो आणण्याचा घाट घातला आहे.

यास स्थानिक रहिवासी आणि आणि आयटीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचा विरोध आहे. या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी रविवारची सुट्टी असल्याने पुनावळे येथे राहत असलेल्या अनेक आयटीयन्सनी या आंदोलनास मोठ्या संख्येने पाठिंबा दिला.

Chinchwad : मैदानी, बौद्धिक खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो; मोबाईल पासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे – हरभजन सिंग

यावेळी माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, (Punavale)सरचिटणीस जयंत शिंदे ,शकुंतला भाट, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, समन्वयक गणेश भोंडवे, अशोक तनपुरे, काशिनाथ जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, विजयकुमार पिरंगुटे, विवेक विधाते, संतोष माळी, राजेश हरगुडे, सुशील घोरपडे, मुख्य प्रवक्ते माधव पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी तुषार कामठे म्हणाले की, पुनावळे येथील कचरा डेपो विरोधात कोर्टात जाणार आहे आणि स्थागितीची ऑर्डर आणणार आहे. मोठ्या प्रकल्पाऐवजी छोटे प्रकल्प राबवावेत जेणेकरून कचऱ्याची वाहतूक करण्याचा ताण कमी होईल. सोबतच आयुक्तांशी चर्चा करून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी बोलणी करणार आहे. हा प्रकल्प रद्द केला नाही तर आमरण उपोषण करणार आहे. यावेळी अनेक आयटी करांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा नियोजित प्रकल्प पुनावळे येथील रहिवाशांना हानिकारक आहे. तसेच यात अनेक झाडांचा बळी जाणार आहे असे सांगितले. या आंदोलनात सिध्दशीला, पुणेविले, कोहिनुर वेस्ट विजे यशवन, इला, ट्वीन आर्क, लाईफ रिपब्लिक जीके रोज ऍस्टर अशा अनेक गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा देत हजेरी लावली.

राज्यात भाजपचे सरकार आहे आणि महानगरपालिकेवर अप्रत्यक्षरीत्या भाजपचाच अंकुश आहे. हा कचरा डेपो दुसरीकडे स्थलांतरित करण्यात किंवा बंद करण्यात भाजपला रस नाही. भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी कचरा डेपो हलवण्यासाठी आंदोलन करायचे ढोंग करत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या कचरा डेपोस तीव्र विरोध केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.