Chinchwad : मैदानी, बौद्धिक खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो; मोबाईल पासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे – हरभजन सिंग

एल्प्रो स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि जल्लोष पाहून मन भारावले

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी मैदानी खेळावर भर (Chinchwad)द्यावे, मैदानी व बौद्धिक खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे, खेळाडूचा स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी घेतलेले कठोर परिश्रम खेळाडूला यशाच्या जवळ घेऊन जातात, असे मत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने व्यक्त केले.

चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनला स्कूल (Chinchwad)मध्ये आयोजित 10 दिवसीय स्पोर्ट फेस्टिवलच्याच्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभास भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली, त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना तो बोलत होता.

Pimpri : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन कोटी 29 लाख 59 हजार रुपयांचा महसूल जमा

हरभजन म्हणाला, एल्प्रो स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि जल्लोष पाहून मन भारावले. मुलांनी स्वतः ठरवावे की त्यांना खेळाडू व्हायचे आहे की नाही. कारण मनात नसेल तर रट्टा मारून एक वेळा अभ्यास करता येतो. पण इच्छाशक्ती असल्याशिवाय खेळाडू बनणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या आवडीचा खेळ खेळा. जो खेळ निवडाल त्या खेळात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करा. इतरांपेक्षा अधिक मेहनत करा, यश नक्की प्राप्त होईल. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी जिद्द व सचोटी बाळगावी त्याने यशापर्यंत पोहचण्यासाठी प्रेरणा मिळते. तसेच सरावांनी शारीरिक दृष्ट्या फीत राहण्याचा प्रयत्न करावा, असे हरभजन म्हणाला.

भारतीय संघा बद्दल बोलताना तो म्हणाला, विश्वचषक हरल्याने सर्वांचेच मन तुटले आहे. पण भारतीय संघ हा अत्यंत मजबूत संघ आहे. त्यातील खेळाडू हे प्रतिभावंत खेळाडू आहेत. पराभवातून ते नक्कीच नवीन काहीतरी शिकतील, असे तो म्हणाला. येत्या टी-20 विश्वचषकाबाबत बोलताना म्हणाला, भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाने रोहित आणि विराट यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा. कारण ते दोघेही वरिष्ठ खेळाडू आहेत. रोहित मध्ये संघाचे नेतृत्व करण्याचे अनिखे कौशल्य आहे. त्या दोघांनीही ही टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळावी, असे मत त्यांने व्यक्त केले.

दरम्यान, हरभजन सिंह याने एल्प्रो स्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळले. यावेळी त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी केली. विद्यार्थ्यांनी भज्जी, भज्जी असे नारे देत त्याचे स्वागत केले. त्यानंतर शाळेतील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. चेस, कॅरम,आर्चरी, टेबल टेनिस, बास्केट बॉल, क्रिकेट अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना हरभजन सिंघ याच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, कर्मचारी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.