Pune : फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या चोरांना बेड्या

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्टेशन येथे आलेल्या प्रवाशाची (Pune) दिवसाढवळ्या पैशांची लुट करणाऱ्या चोरांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी रायचूर, कर्नाटक येथून रेल्वेने पुणे येथे आले. त्यानंतर रेल्वे स्थानकावर उतरून रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या रिक्षा पॉईन्ट जवळ बसले होते.

त्याठिकाणी अक्षय विजय सूर्यवंशी (वय 25 रा.काळेओढा, वाघोली, पुणे) आणि अब्दुल रहेमान अबुजर तामटगार (वय 29 रा. अप्पर डेपो, कात्रज, पुण हे दोघे संगनमत करून फिर्यादी जवळ आले.

आणि ‘तुम्हारे पास कितना पैसा है, पैसा निकाल, पैसा देता क्या नही, नही तो मार दु क्या’ अशी धमकी देत, फिर्यादी जवळ असलेले 1500 रुपये जबरीने काढून घेतले.

ते तेथून पलायन करत असताना, फिर्यादी चोर,चोर म्हणत जोरात (Pune) ओरडत होते. तो आवाज थोड्याच अंतरावरून मोटार सायकलवर जाणाऱ्या पोलीस कर्मचारी-यांनी ऐकला.

आवाज ऐकताच पोलीस चोरांच्या मागे लागले. पोलिसांनी वेगाने धावणाऱ्या चोरांना मोटार सायकल वरून पाठलाग करत थोड्याच अंतरावर ताब्यात घेतलं.

चोरांना अटक करून त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गावडे हे करत आहेत.

Talavade : शॉर्टसर्किटमुळे फेब्रीकेशनच्या दुकानाला आग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.