Talavade : इलेक्ट्रिक साहित्याच्या गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग (Talavade) लागली. ही घटना सोमवारी (दि. 11) पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग निवृत्ती नरवटे यांचे नम्रता इलेक्ट्रिक्स अँड केबल हाऊस नावाचे इलेक्ट्रिक दुकान आहे. त्यांचे गोडाऊन टॉवर लाईन जवळ आहे. सोमवारी पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांच्या गोडाऊन मध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे सर्व बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यासह टाटा कंपनी, बजाज कंपनी तसेच एमआयडीसीचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Rohit Pawar : मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, मला तुरूंगात देखील टाकले जाईल – रोहित पवार

अजूनही गोडाऊन मधून धूर येत आहे. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने सर्व साहित्य बाजूला करून ही आग पूर्णपणे विझवली जाणार आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रात्रीच्या वेळी गोडाऊनमध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोडाऊनमध्ये इलेक्ट्रिक केबल, बोर्ड आणि इतर सामान ठेवलेले होते. हे सर्व साहित्य आगीत जळाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले (Talavade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.