Rohit Pawar : मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, मला तुरूंगात देखील टाकले जाईल – रोहित पवार

एमपीसी न्यूज – आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ( Rohit Pawar ) ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत. “पक्ष चोरी केल्यानंतर माझ्यावरील कारवाईला सुरुवात झाली. ईडीची यामध्ये काहीही चूक नाही. मी त्यांना सहकार्य केलं आहे. आम्ही 22 फेब्रुवारी रोजी सर्व माहिती त्यांना दिली होती”, असं रोहित पवार म्हणाले. ते पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, की कोणत्याही एफआयआरमध्ये माझे आणि बारामती ॲग्रोचे नाव नाही. दोन वर्षं ईडीने कारवाई केली नाही. 19 जानेवारीला मला नोटिस आली आणि ईओडब्ल्यूने 20 जानेवारीला क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यात क्लिन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषातून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  8 मार्च रोजी ( Rohit Pawar ) बारामती ॲग्रोला प्रेस नोटद्वारे नोटीस आली. ही प्रेस नोट चुकीची आहे. अशीच प्रेस नोट जरंडेश्वरच्या प्रकरणातही आली होती. ही प्रेस नोट कट कॉपी पेस्ट केलेली आहे. त्यामुळे या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले, विधानसभेत देखील मला अनेकांनी सांगितलं की तू गप बस असं सांगितलं. मात्र, आम्ही या प्रकरणात कुठे ही घाबरत नाहीत. ज्यांचे नाव दोषी म्हणून आहे, त्यातील 70 टक्के नावं भाजप, शिवसेना अजित दादांकडे आहेत. एकावरही आत्तापर्यंत कारवाई केली नाही. मात्र आता, माझ्यावर केस आली मी लढणार आणि जिंकणारच आहे. पुढील 2-3  महिन्यात मला जेलमध्ये टाकले जाईल, असे आरोप रोहित पवारांनी केले आहेत.  मी संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस काढली गेली. निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून मला नोटीस दिली जातेय का? मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असे सवालही रोहित पवार यांनी केले ( Rohit Pawar ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.