Today’s Horoscope 11 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 11 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 11.03.2024.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा.

चंद्र राशी – मीन.

—————————–

मेष – ( शुभ रंग – चंदेरी)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. आज एखादी महत्त्वाची वस्तू गाळ होऊ शकते. सतर्क रहा.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज मनासारखी खरेदी ही करता येईल. आज रात्रीच्या प्रवासात बेसावध राहू नका.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल पण अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपूनच वापरा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

कर्क – (शुभ रंग – सोनेरी)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

सिंह -( शुभ रंग – आकाशी)

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील.

कन्या – ( शुभ रंग- क्रीम)

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे.

तूळ – ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द मात्र जपून वापरा.

वृश्चिक-  ( शुभरंग – मोरपंखी)

दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील.

धनु – (शुभ रंग- गुलाबी)

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

मकर – (शुभ रंग- पांढरा)

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच रमतील.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील.

मीन – ( शुभ रंग- मोतिया)

आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नात्यात गैरसमज होतील. कुणालाही सल्ले न देता स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्या.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.