Pimple Gurav :पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या व सासरच्या जातीला कंटाळून विवाहितेने राहत्या (Pimple Gurav)घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे ही घटना 10 ऑक्टोबर 2023 रोजी पिंपळे गुरव येथे घडली आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात उमेश मारुती लोकरे (वय 52) यांनी फिर्यादी असून फिर्यादीवरन पती महेश पोपट केंजळे ,तीन महिला आरोपी, पोपट रामचंद्र केंजळे, खरात सर्व राहणार पिंपळे गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple Saudagar: प्लेस्को च्या वतीने (PLESCO)महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा सत्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पिडीतेला (Pimple Gurav)लग्नामध्ये मानपान केला नाही, कार घेण्यासाठी व व्यवसायासाठी बाहेरून पैसे आणले नाहीत तसेच मूलबाळ होत नाही म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. तसेच आरोपी महेशला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो सतत पिडीतेला मारहाण शिवीगाळ करत होता.

त्याच्या या त्रासाला कंटाळून पिडीतेने पिंपळे गुरव येथील राहत्या घरी बेडरूमच्या सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली आहे. यावरून सांगवी पोलिसांनी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.