Pimple Saudagar: प्लेस्को च्या वतीने (PLESCO)महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – यंदाच्या वर्षी महाराष्ट्र केसरी ठरलेल्या (Pimple Saudagar)सिकंदर शेख यांचा “पिंपळे सौदागर स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन” च्या (PLESCO)वतीने उमेश काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी किताब मिळवण्यासाठी (Pimple Saudagar)केलेला संघर्षपूर्ण प्रवास मल्लांसह तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे मत उमेश काटे यांनी व्यक्त केले. यावेळी सिकंदर शेख यांना शाल व पुष्पगुच्छ गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना ऑलिंपिकसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध खेळांना चालना देण्यासाठी आणि सांस्कृतिक कलांचे संवर्धन करण्यासाठी उमेश काटे यांच्या वतीने “पिंपळे सौदागर स्पोर्ट अँड कल्चरल ऑर्गनायझेशनची” (PLESCO)स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत स्थानिक खेळांसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच भारतीय कला,संस्कृतीसह भारतात महत्त्वाचे असलेल्या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून कला व संस्कृतीचे संवर्धन करण्यात येते.

 

 

यावर्षी प्लेस्को च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठे दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 15000 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सर्व सोयी,सुविधा,व्यवस्थापन आणि सुरक्षितता यामुळे यंदाचा प्लेस्को दांडिया महोत्सव अविस्मरणीय ठरला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.