Khed : बँकेकडील तारण असलेली जमीन विकून व्यापाऱ्याची नऊ लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचा व्यवहार करत खोटे(Khed) बक्षीस पत्र बनवून एका व्यापाराची महिला व्यवसायिकाने तब्बल नऊ लाख रुपयांना फसवणूक केली आहे ही घटना 15 जून 2019 ते आज पर्यंत खराबवाडी तालुका खेड येथे घडली आहे.

याप्रकरणी मनोहर मोनिराम नायडू (वय 63, भोसरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे फिर्यादीवरून अमृता शाम केसवड (वय 39 रा.खराबवाडी) व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

BopKhel News : प्रशासकीय राजवटीत बोपखेल पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष; माजी उपमहापौरांचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळकत गट (Khed)नंबर 273 गट नंबर 277 व गट नंबर 278 मध्ये आरसीसी इमारत येथील 7583 चौरस मीटर व 75.83 चौरस मीटर एकूण 522 चौरस फूट जमिनीचा आरोपींनी फिर्यादी यांच्याशी व्यवहार ठरवला संबंधित जमीन ही 92 लाख रुपयांचे असून ती 82 लाख रुपयाला देत असल्याचे सांगत यासाठी फिर्यादी यांच्याकडून आरोपीने नऊ लाख रुपये घेतले.

मात्र संबंधित जमीन ही बँकेकडे तारण असल्याची कोणतीही माहिती आरोपींनी फिर्यादी यांना दिली नाही. तसेच विक्रीचा व्यवहार सुरू असताना आरोपीने पत्नीच्या संमतीने आपल्या मुलाच्या नावे त्या जमिनीचे बनावट बक्षीस पत्र बनवून घेतले. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादी यांनी माहाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.