Bhosari : दहा लाख रुपयांच्या गांजासह दोघांना नाशिक फाटा येथून अटक

एमपीसी न्यूज : अमली पदार्थविरोधी पथकाने 10 लाख 24 हजार रुपयांच्या (Bhosari) गांजासह दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपूला खाली केली.

किसन भामटा पावरा (वय 40, रा. नंदुरबार), आकाश रेलसिंग पावरा (वय 24, रा. नंदुरबार) असे अटक आरोपींची नावे आहेत. तर तुळशीराम (रा. नंदुरबार) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी फिर्यादी दिली आहे.

Khed : बँकेकडील तारण असलेली जमीन विकून व्यापाऱ्याची नऊ लाख रुपयांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाला नाशिक फाटा येथे दोघेजण गांजा विक्रीला आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून किसन व आकाश यांना ताब्यात (Bhosari) घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 24 हजार 900 रुपयांचा दहा किलो 249 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 10 लाख 44 हजार 300 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

यावेळी त्यांनी हा गांजा आरोपी तुळशीराम यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.