Maharashtra : महाराष्ट्रात दिगंबर आणि श्वेतांबर जैन संताना मिळणार पोलीसांची सुरक्षा

एमपासी न्यूज – महाराष्ट्रात जैन संताना सुरक्षा मिळावी (Maharashtra) या संबंधी मोठे पाऊल उचलेले गेले आहे. त्यांच्यावरील हल्ले रोखण्यासाठी आता पोलिसांकडून दिगंबर व आणि जैन संताना सुरक्षा पुरवली जाणार आहे. या संदर्भात 25 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र गृह मंत्रालयाने आदेश काढले आहेत.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार सदस्य अंकुर जैन यांनी या संदर्भात 1 जुलै रोजी मागणी करणारे पत्र गृह खात्याला दिले होते. या मागणीनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुढे महाराष्ट्रातून कोणीही जैन साधू संत जात असताना त्यांनी जे समाजकंटक त्रास देत असतील तर त्वरीत पोलिसांकडे तक्रार करावी त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Bhosari : दहा लाख रुपयांच्या गांजासह दोघांना नाशिक फाटा येथून अटक

जैन बांधवानी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे जैन धर्माला महाराष्ट्रात एक सुरक्षित वातावरण व आपलेपणा (Maharashtra) मिळेल असा विश्वास जैन बांधवानी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.